Ad will apear here
Next
पॉटरी कलाकृतींची पुणेकरांना भुरळ

पुणे : देशभरातील ‘पॉटरी’ कलाकारांनी सिरॅमिक, टेराकोटा माध्यमात साकारलेल्या वैविध्यपूर्ण कलाकृती बघण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. ‘पुणे पॉटर्स मार्केट २०१९’ या खास ‘पॉटरी’महोत्सवाला फिनिक्स मार्केट सिटी येथे सुरुवात झाली असून, या महोत्सवात मुंबई, भावनगर, विजयवाडा, पुणे, हैद्राबाद, कानपूर, अहमदाबाद, अहमदनगर, कोलकाता आदी ठिकाणांहून आलेले १६ कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांनी घडवलेल्या आकर्षक भेटवस्तू, मातीची भांडी, मातीपासून बनविलेले दागिने, नक्षीदार फुलदाण्या, पणत्यांचे स्टँड, मातीची घड्याळे अशा एक ना अनेक दुर्मिळ कलाकृती पहायला मिळत आहेत. 


‘आयजीए’चे संस्थापक इंद्रनील गराई यांच्या संकल्पनेतून साकार झालेला व ‘आयजीए गॅलेरीया’द्वारा आयोजित हा महोत्सव रविवार, दि. आठ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री नऊ वाजेपर्यंत फिनिक्स मार्केट सिटी येथे खुला राहणार आहे. त्याचप्रमाणे शुक्रवार, दि. १३ सप्टेंबर ते रविवार, १५ सप्टेंबर दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हिलियन मॉल येथेदेखील या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यात देशातील आणखी १६ कलाकार सहभागी होणार आहेत.

इंद्रनील गराई
‘भारतातील सर्वात पहिल्या महिला ‘पॉटरी’ कलाकार निर्मला पटवर्धन या पुण्यातील होत्या. त्यांच्याकडे देशभरातून कलाकार ही कला शिकण्यासाठी येत असत, मात्र असे असूनही आजही पुण्यात आणि एकूणच देशात या कलेविषयीची जागरूकता नाही,’ अशी खंत व्यक्त आयोजक गराई यांनी व्यक्त केली. 

 ‘जेथे नदी असते जवळपास त्या प्रत्येक ठिकाणी पूर्वापार कुंभारकाम चालत आलेले असते; परंतु त्यात अनेक प्रयोग करून, संशोधन करून ही वैशिष्ट्यपूर्ण ‘पॉटरी’ कला विकसित झाली आहे. जसे एखाद्या चित्रकाराचे चित्र हे एकमेवाद्वितीय असते. त्याच्या अनेक प्रती निघू शकत नाहीत; तसेच या कलेतील कलाकृतींचे असते. याविषयी लोकांमध्ये फारशी जागरूकता नाही. त्यामुळेच या कलेला हवी तशी बाजारपेठ मिळत नाही. या कलेचे वेगळेपण पुणेकरांसमोर आणण्यासाठी पुण्यात एवढ्या मोठ्याप्रमाणात आम्ही हा महोत्सव भरविला आहे,’ असेही गराई यांनी स्पष्ट केले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZYBCE
Similar Posts
पुण्यात भव्य पॉटरी महोत्सवाचे आयोजन पुणे : ‘पॉटरी’ ही कला अत्यंत प्राचीन असून, मानवाचे हे पहिले नाविन्यपूर्ण संशोधन समजले जाते. कलासक्त पुणेकरांना ‘पुणे पॉटर्स मार्केट २०१९’ महोत्सवात या कलेतील अनोखे नमुने ज्येष्ठ कलाकारांच्या कलाकृतीतून अनुभवण्याची संधी मिळणार आहे. रुबी झुनझुनवाला, शालन डेरे, संदीप मंचेकर, खंजन दलाल, गौरी गांधी, शयोन्ती
साडेतीनशे महिलांनी पायांनी रंगवले भव्य चित्र पुणे : तब्बल साडेतीनशे महिलांनी एकत्र येऊन आपल्या पायांनी एक भव्य चित्र साकारले. महिला दिनानिमित्त शुक्रवारी, आठ मार्च २०१९ रोजी पॅव्हिलियन मॉलमध्ये हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. जागतिक विक्रम घडविण्याच्या दृष्टीने आयोजित या उपक्रमाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते’ पुणे : ‘पूरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले; परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल; पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा, चांगले शिक्षण घ्या, आरोग्य उत्तम ठेवा व चांगले नागरिक बना. शिक्षण हेच
‘सूर्यदत्ता’करणार व्यसनमुक्ती, नीतिमूल्यांची रुजवण पुणे : ‘समाजातील व्यसनाधीनता दूर करून, नीती आणि मूल्यांचे शिक्षण देत समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे ‘सूर्यदत्ता ग्लोबल रिहॅबिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन मुक्तांगण पुनर्वसन केंद्राच्या मुक्ता पुणतांबेकर यांच्या हस्ते होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language